मी आरसा बोलतोय मराठी निबंध | me aarsa boltoy marathi nibandh
नमस्कार मित्रांनो आज आपण मी आरसा बोलतोय मराठी निबंध,me aarsa boltoy marathi nibandhबघणार आहोत.
मी आरसा बोलतोय
मी माझी दाडी निरखत होतो. ती अस्फुट अस्फुट दिसत होती .कसा आकर होईल तिचा ? मला मिशी हवी थोडीशी रुंदी.ओठांवरुन किंचीत उतरत उतरत येणारी आणि ओठांच्या टोकांवर येताच झटकन खाली वळणारी . माझ्या मिशीचा आकार हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन ? मी कोणाकोणाला आवडेन ? माझ्या डोळ्यां समोर काही चेहरे तरळू लागले . मी गुंग होत गेलो .
खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला . मी चटकन इकडे तिकडे पाहिले. पण, समोरचा आरसाच मला हसत होता . हे कळायला मला फार वेळ लागला नाही . वा ! वा ! तू किती छान गुंग झाला होतास ,नाही का ? पण ,दे जाऊ दे . तुम्हा माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे !

हे बघ , प्रत्येक माणसाचं स्वत: वर सर्वात जास्त प्रेम असत . आपण इतरांपेक्षा वेगळ दिसाव म्हणून ,प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती , कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याचा प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वतलावर अनंत पराक्रम गाजवले आहे. म्हणून तर आज माणूस सर्व प्राण्यांचा राजा , या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय .
पराक्रमी माणसांनी आपल्या पप्रत्येक पराक्रामानंतर आरशात स्वत:ला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून , हात उंचावून 'माझा विजय असो ' अस मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वत: चा जयजयकार केला असणारच , हे लक्षात ठेव . तुमच्या मनातल्या या प्रेरणा निर्माण मीच आहे .मीच तुमची प्रगति घडवून आणतो .
हे निबंध सुधा जरूर वाचवे:-

आठवते का रे ? जत्रेत आपली भेट झाली होती ! किती विविध रुपात मी या आरसे महलात अवतरलो होतो ! तू तर नुसता लोटपोट हसत होतास . तुझ्या किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या ! गोलगरगरीत , हळकुंडी एकदम बुटकी , किती प्रतिमा ! एका आरशातील प्रतिमा आठवतं ? ,माझं डोक भोपळ्या एवढ ,बाकीचा वेष दोन - अडीच फुट फक्त ! काय हसत होता तुम्ही सगळेजण !
लक्षात ठेव . ही माझी रुप केवळ विनोद करण्यासाठी निर्माण झालेला नाहीत . ड्राइवरला पाठीमागून येणारी वाहने दाखवण्यासाठी मीच गाडीच्या कडेला बसतो . वेगवेगळी भिंग माझीच रुपं आहेत. प्रयोग शाळेच्या सुक्ष्मदर्शका पासून अवकाशातल्या ग्रह गोलांचे निरीक्षण करणार्या दुर्बिणी पर्यंत सर्वत्र मीच असतो . घरादारात , रस्त्यांवर, कपड्यांवर ,दुकानावर , गाड्यांमध्ये ,जत्रेमध्ये , इथे तिथे सर्वत्र मीच असतो . पण लक्षात ठेव , मी कधी स्वत : च्या मिजाशीत राहीलो नाही .
" पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वत:लाच स्वत : च दर्शन घडले असणार . तेव्हा पासून मी त्याच्या सोबत आहे . मी स्वत:ला बाजूला ठेवून माणसाला मदत केली . तू सुध्दा अशीच मदत करीत रहा . पहा , केवढा होशील तू ! "
तर मित्रांनो हा होता मी आरसा बोलतोय मराठी निबंध | me aarsa boltoy marathi nibandh एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- आरसा मनोगत
- atmakathan nibandh in marathi
- आत्मकथन मी आरसा बोलतोय