मुंगी मराठी निबंध | Mungi var Marathi Nibandh | essay on ant in marathi

मुंगी मराठी निबंध | Mungi var Marathi Nibandh | essay on ant in marathi
मुंगी मराठी निबंध | Mungi var Marathi Nibandh | essay on ant in marathi

मुंगी मराठी निबंध | Mungi var Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो आज आपण मुंगी मराठी निबंध , Mungi var Marathi Nibandh,  essay on ant in marathi बघणार आहोत.


मुंगी

    मुंगीला कोण ओळखत नाही ? ती जमिनीवर प्रत्येक ठिकाणी पाहिजे चालते. शेकडो हजारो मुंग्या एकीने जवळ राहतात. घरात थोडे काही सांडू देत ५ मिनीटा पेक्षा कमी वेळ लागतो मुंग्या जमायला.


        मुंगी चा लाल आणि काळा रंग असतो. काही मुंग्या आकाराने मोठ्या असतात .काही मुंग्या खूप छोट्या असतात . त्यांना सहा पाय असतात. मुंगी बिळात राहते . बिळात त्यांची पुर्ण वस्ती असते . मुंग्यांच्या समुहात त्यांची एक राणी मुंगी असते . सर्व मुंग्या राणी मुंगीची आज्ञा पाळतात .


          मुंग्यांना गोड पदार्थ खूप आवडतात . ते साखरेचे किंवा अन्नाचे दाणे घेऊन जातात . मुंगी नेहमी तिच्या भविष्यासाठी अन्न गोळा करण्याच्या कामात लागलेली असते . गुळाचा एक कण नेण्यासाठी ती मुंगी अपार कष्ट घेत असते. अगदी पेलेवत नसेल तरी तो कण , भार वाहून नेत असते, मग भले माझी मुंडी तुटो ह भाव तिचा असतो. नेहमीचाच त्रास देणारा जीव, पण त्यांचा जिवन प्रवास थक्क करून सोडणारा आहे.


        उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंग्याच्या रांगाच रांगा दिसत होत्या, दाराच्या , खिडक्यांच्या फटींतून त्यांची लगबग आणि मुख्य म्हणजे शिस्त पाहून मला गंमत तर वाटलीच आणि कुतुहलही दाटले की एक एवढासा छोटासा जीव पण अन्नाचा इतकुसा कण मिळवायला किती परिश्रम घेतो आणि किती कौशल्याने सारी कामे करतो. तसे मनात आले की मुंग्याच्या ह्या वागण्यात काही तरी अर्थ, सूत्रबध्द संचालन नक्कीच असले पाहिजे.


         आपतींना न घाबरता , उत्तम पणे कसे व्यवस्थापन करून तोंड द्यायचे ह्याचा जणू एक आदर्शच ह्या मुंग्याचा समूह आपल्याला शिकवीत आहे. मुंग्यांची संरक्षणप्रणाली इतकी प्रभावी आहे की मानवालाही संरक्षणनीती ठरवायला त्यापासून प्रेरणा मिळत आहे.


       मला मुंगी कडून खूप शिकायला मिळाले . त्यांचे मिळून मिसळून प्रेमाने सोबत  राहणे . तसेच भविष्यासाठी गोळा करणे ,संग्रह करणे असे बरेच काही शिकायला मिळते . मुंगी हा किटक खूप हुशार आणि मेहनती आहे .



तर मित्रांनो हा होता मुंगी मराठी निबंध | Mungi var Marathi Nibandh | essay on ant in marathi  एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाधन्यवाद.

टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • Essay on Ant in Marathi

Previous
Next Post »