![]() |
मला पंख असते तर मराठी निबंध | Mala Pankh Aste Tar Nibandh In Marathi |
मला पंख असते तर मराठी निबंध | Mala Pankh Aste Tar Nibandh In Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण मला पंख असते तर मराठी निबंध, Mala Pankh Aste Tar Nibandh In Marathi बघणार आहोत.
मला पंख असते तर...
माझ्या मावस भावाचे लग्न होते . मला भावाचा फोन आला . लग्नाला येण्यास आग्रह करत होता . मी म्हणाली की ,माझी परिक्षा असल्यामूळे मी येऊ शकत नाही . पण मला खूप वाईट वाटत होत की, मी लग्नाला जाऊ शकत नव्हती . परंतु त्याला वाईट वाटु नये म्हणून मी सहज हसत खळत म्हणाली मला पंख मिळाले तर मी तुझ्या लग्नाला उडत उडत येईल . परंतु मी बोलले खरं पण त्याच वेळेस माझ्या मनात विचारांचे काहुर पेटले .
मला पंख मिळाले , तर मला जिथे जायचे असेल तिथे मी पटकन उडत उडत जाईन . मी रोज शाळेत उडत उडत जाईन . शाळेत अगदी वेळेवर पोचणार . मला उशीर होणार नाही . उशीर झाल्यामूळे शिक्षा भेटते . मग शिक्षा भेटणार नाही . मला वर्गात कंटाळा अल्यावर खिडकी वर बसेन . झाडावर बसेन . भुक लागल्यावर मध , फळे खाईन .पकडा पकडी खेळायला खूप मजा येईल . कुठे जातांना गर्दी चा त्रास होणार नाही. वाहनांची वाट पहावी लागणार नाही . पेट्रोल ,डिझेल ,गॅस लागणार नाही . भाड्याचे पैसे खर्च होणार नाही . पैसे वाचतील . मला पंख मिळाले , तर किती मज्जा येईल .
मला पंख मिळाले तर मी गरूडासारखे शक्तिशाली पंख घेईन . मला विस्तीर्ण असे विशाल पंख हवेत . मी उंच आकाशातून माझे गाव , माझा देश कसा दिसेन तो पाहिल . मी दुसर्या देशात उडत उडत जाईन . खूप मज्जा करेल.
मला पंख मिळाले , तर मी खूप ठिकाणी जाईन . परदेशात जाईन . हिमालयात बर्फांच्या शिखरांवर जाईन . समुद्रावर गिरक्या घेईन . मामा कडे , मावशी कडे जायची खूप ईच्छा असते . मी उडत उडत त्यांच्या कडे जाईन . मी सुट्टीच्या दिवशी उडत उडत माझ्या मैत्रीणीं सोबत जाईन .
बघा.. नुसत्या विचारांनाच पंख फुटले तर आपन कुठे कुठे जाऊन येतो , मग खरंच पंख फुटले तर!!
तर मित्रांनो हा होता मला पंख असते तर मराठी निबंध , Mala Pankh Aste Tar Nibandh In Marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.