माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध | My Favorite Game Kabaddi Essay In Marathi | essay on kabaddi in marathi

माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध | My Favorite Game Kabaddi Essay In Marathi | essay on kabaddi in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध, My Favorite Game Kabaddi Essay In Marathi,essay on kabaddi in marathi बघणार आहोत


माझा आवडता खेळ कबड्डी

आपल्या  भारत देशमध्ये विविध  प्रकारचे खेळ खेळले जातात. जसे कि खो – खो, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन,  टेनिस इ. .  प्रत्येक व्यक्तीचा आपला आवडता एक खेळ असतो. कोणाला फुटबॉल तर कोणाला बॅडमिंटन हा खेळ आवडतो. तसेच  प्रमाणे माझा आवडता खेळ आहे – कबड्डी. कबड्डी या खेळाची वेगवेगळी नावे आहेत.   या खेळाला ‘हुततू’ या नावाने  पण ओळखले जाते.  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये या खेळाला 'चेडुगुडू' असे म्हटले जाते.
     

कबड्डी या खेळासाठी कोणत्याही वस्तू विकत आणावे लागत नाही .त्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही .गरीब श्रीमंत सर्व मुली खेळू शकतात .कबड्डी खेळण्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते . महाराष्ट्रात शिमगा, होळी सणांच्या वेळी हा खेळ खेळला जात असे. प्रामुख्याने आखाडय़ात व तालमीत हा खेळ खेळला जात असत . मुका असलेला हा खेळ हळूहळू बोलका होऊ लागला. हळूहळू क्रिकेट खेळा सारखाच कबड्डी खेळाचा सामना होउ  लागला .  कबड्डी भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
   

कबड्डी  खेळण्यासाठी एका मैदानाची आवश्यकता असते. मैदांची रुंदी १० मी आणि लांबी १२.५० मी इतकी असते. मैदानाच्या  मध्य भागावर एक रेषा आखली जाते. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात .

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



कबड्डी हा खेळ भारतात जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच तो भारताचे शेजारी देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानातही लोकप्रिय आहे. भारताबरोबरच बांगलादेशचा कबड्डी हा राष्ट्रीय खेळ आहे.  अखिल भारतीय कबड्डी संघटना  कबड्डी खेळाचा प्रसार व प्रचार केला. कबड्डीला आंतरराष्ट्रीय केले.
   

कबड्डी या खेळाचे फायदे खूप आहेत. कबड्डीमुळे शरीर सुदृढ व  निरोगी राहते. निर्णय करण्याची क्षमता वाढते, परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते.  अंगी सामर्थ्य आणि चतुराई निर्माण होते. कबड्डी हा खेळ आपल्याला धाडसाला आणि परिस्थितीला समोरे जायला प्रेरणा देतो.  कबड्डी हा खेळा मला खूप खूप आवडतो.




तर मित्रांनो हा होता माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध | My Favorite Game Kabaddi Essay In Marathi | essay on kabaddi in marathi  एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.

 टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • माझा आवडता खेळ 
  • essay in marathi on games
  • maza avadta khel kabaddi


Previous
Next Post »