माझा आवडता ऋतू
|
माझा आवडता ऋतू मराठी निबंध , Maza Avadata Rutu In Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता पावसाळा ऋतू मराठी निबंध , Maza Avadata Rutu Essay In Marathi बघणार आहोत.
पावसाळा ऋतु
आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू पावसाळा. " येरे येरे पावसा
तुला देतो पैसा पैसा
झाला खोटा पाऊस आला
मोठा" असे गाणे म्हणत
म्हणत आणि पहिल्या पावसात
खेळायचो. जुन महिना सुरू झाला आणि पावसाळा आला असे समजावे. विज कडाडते, ढग गडगडतात आणि मग थंब थेंब पडायला लागतात.
पावसाळा ऋतू जून महिन्यापासून सुरु होतो आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालत राहतो. हल्ली 7 जूनला
सुरू होणारा पावसाळा कधी जुलै तर
कधी ऑगस्ट महिन्यात सुरू होतो. या
पैसा मागे धावणारा माणूस
आणि त्यामुळे पूर्ण पर्यावरणाचा तोल ढासळला. दरवर्षी
७जून ला पावसाळा
सुरू व्हायचा आता मात्र पावसाळा
सुरुवात होण्याची वेळ चुकली .
"सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय
शाळेभौवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. "
पावसाचा आनंद अगदी वेगळाच,
पाऊस सुरू होण्याआधी उन्हाळ्याच्या
गरमीने संपूर्ण जमीन तापलेली असते.
लोक गरमीने येणाऱ्या घामाने अस्वस्थ झालेले असतात आणि
ढगांकडे पाहू लागतात सगळ्यांचा
मनात एकच इच्छा असते
ती म्हणजे पाऊस कधी सुरू
होतो आणि कधी हा
पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो.
रिमझिम पावसाळा
सुरू होताच त्या पावसात पडल्याने
सर्वीकडे झाडे हिरवीगार होतात.
गर्मीने तापलेल्या वातावरणात गारवा निर्माण होतो. पाऊस कधी रिमझिम
येतो तर कधी कधी
धो धो कोसळतो सर्वत्र
अाटलेल्या नद्या नाले तलाव यांना
पुन्हा पाणी येते. शेतीच्या कामाला सुरुवात होते पावसामुळे शेतकरी
खुश होतात . काही महिन्यात शेतात
पीक डोलू लागते या
पावसावरच शेतकरी त्याची शेती करतो त्या
पावसावर तो जगतो जशी
पिक जगतात.
पावसात शाळेत जाताना खूप मज्जा येते
ती मजा तर खूप
वेगळी असते . मला शाळेत जाण्यासाठी
माझे वडील रेनकोट घेऊन
देतात .मला पावसात जायला
आवडते आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी
वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडतो . पाऊस कधीकधी इतका
पडतो की सगळीकडे पाणीच
पाणी साचते आम्हाला शाळेला सुट्टी मिळते .
हे निबंध सुधा जरूर वाचवे:-
माझा आवडता ऋतू हिवाळा
अचानक आलेला पाऊस
अचानक आलेला पाऊस
पावसात इंद्रधनुष्य बघायला मिळतो तो खूप छान
दिसतो . सर्व ठिकाणी बेडूक
ओरडतात. ढगांचा आवाज झाला की
मोर रानात नाचतो. या पावसाचा आनंद
घेतो पण मी कधी
प्रत्याक्षात पाहिले नाही
पण वाचले आहे आणि टीव्हीवर
मोबाईलवर आता पाहिले आहे.
सध्या व्हिडिओ बनवलेले असतात मोबाईल वर पाहिले. खरोखर
प्रत्यक्षात अजून पाहिले नाही.
पाऊस पडतो तेव्हा मोर
रानात नाचू लागतो मला
तो नाच बघायला नक्की
आवडेल.
पावसामुळे आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. गर्मीने तापलेले वातावरणात थंड होते. आम्हाला
पावसात खूप मज्जा करायला
मिळते . म्हणून मला पावसाळा ऋतु
खूप आवडतो आणि पावसामुळे शेतकरी
शेती करतो आणि शेतकरी
ने केलेली मेहनत यामुळे शेतीचे उत्पन्न मिळते त्यावर आपण जगतो. भारत अजूनही एक शेती प्रधान देश आहे, भारतातील ६७% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने शेतीवर अवलंबून आहेत. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात मान्सून हंगामावर म्हणजेच पावसावर अवलंबून आहे.
पाऊस म्हणजे निसर्गाची एक अजब देणच आहे. माणसांना, पशु-पक्षांना , झाडे -वेलींना पाण्याची फार गरज असते, ती गरज पावसामुळे भरून येते. पावसाळा लाखो लोकांना उपजीविकेचे साधन देतो. अन्न
हे आपल्या जीवनाची गरज आहे. त्यामुळे
पावसाळा ऋतु मला खूप
खूप आवडतो.
तर मित्रांनो हा होता माझा आवडता ऋतू मराठी निबंध,Maza Avadata Rutu Essay In Marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- rainy season essay in marathi
- marathi essay on rainy season
- essay on rainy season in marathi
- essay in marathi on rainy season
- rain essay in marathi