माझा आवडता ऋतू मराठी निबंध , Maza Avadata Rutu In Marathi |
माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध , Maza Avadata Rutu In Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता ऋतू मराठी निबंध , Maza Avadata Rutu Hivala In Marathi बघणार आहोत.
माझा आवडता ऋतू हिवाळा
आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. 'शरद' ऋतू किंवा 'हिवाळ्याचे' आगमन पावसाळ्यानंतर होते. हिवाळा हा भारतातील मुख्य ऋतूंंपैकी एक आहे. तो नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत असतो. हिवाळ्याच्या दिवसात उबदार पांघरुणात झोपायला फार मजा येते.
पावसाळ्यात भरपूर पाणी मिळाल्याने या ऋतूत निसर्ग तृप्त होतो . हिवाळ्याचा दिवसात पहाटे सर्वत्र धुके पडते. अशा वातावरणात अनेकजण स्वेटर नाहीतर शाली घालून सकाळी फिरायला निघतात. याच ऋतूत पक्षी स्थलांतर करतात. हिवाळ्यात तापमान कमी होते. दिवस लहान होतात आणि रात्री मोठ्या असतात.
हे निबंध सुधा जरूर वाचवे:-
माझा आवडता ऋतू पावसाळा
हिवाळ्यात नाताळ हा सण येतो. सांताक्लॉज वेगवेगळ्या भेटी देतो. याच ऋतूत मकरसंक्रांत येते. हा सण मला फार आवडतो. सर्व माणसे एकत्र येतात. संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू करतात आणि तिळगूळ वाटतात. उष्णता निर्माण करणारे हे विविध पदार्थ या ऋतूला आवश्यक असतात. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटतो. हिवाळा ऋतू गावोगावी जत्रा भरतात.
हिवाळ्यात पाऊस पडत नाही . हिवळयात घाम होत नाही. हिवाळा ऋतूत थंडी खूप पडते आणि थंडीत थुडथुडायला मला आवडते . थंडीत स्वेटर घालायला आवडते . दिवस रात्र थंडी लागते . थंड हवामान कठोर असू शकते. सर्दी आणि इतर आजार होऊ नये म्हणून उबदार कपडे घालणे आणि खबरदारी घेणे महत्वाचे आहे. हिवाळ्यात रात्री झोपन्याआधी अंगणात शेकुटी करतात . ती शेकूटी घ्यायला मला खूप आवडत . म्हणून हिवाळा ऋतू मला खूप खूप आवडतो .कारण हिवाळ्यात भूक भरपूर लागते आणि खाल्लेले अन्न पचन होते. शरीराला ऊर्जा भरपूर प्राप्त होते. हिवाळा ऋतू लवकर जाऊ नये असे नेहमी मला वाटते.
तर मित्रांनो हा होता माझा आवडता ऋतू मराठी निबंध,Maza Avadata Rutu In Marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- maza avadata rutu hivala marathi nibandh
- maza avadata rutu marathi nibandh