Marathi essay on Achanak Alela Paus | Essay on Rainy Day |
अचानक आलेला पाऊस मराठी निबंध , Marathi essay on Achanak Alela Paus , essay on rainy day
नमस्कार मित्रांनो आज आपण अचानक आलेला पाऊस मराठी निबंध, Marathi essay on Achanak Alela Paus , essay on rainy day बघणार आहोत.
अचानक आलेला पाऊस निबंध क्रं. १
पावसाळ्याचे दिवस म्हणजे उन्हाळ्यातील उष्णता आणि कोरडेपणापासून एक विश्रांती. असेच , एके दिवशी बाबांच्या बरोबर बाजारात गेली होती . घरून निघताना कडक ऊन पडले होते . पावसाची कोणतीही चिन्हे नव्हती. परंतु बाजारात पोहचेपर्यंत गार वारा सुटला. वारा आल्यावर मला खूप बरे वाटले. काही वेळात वाऱ्याबरोबर काळे ढग आकाशात जमा झाले . वाऱ्याचा वेग अधिकच वाढला. मला खूप भीती वाटू लागली. तेव्हा विजेचा कडकडाट सुरु झाला. जोरदार पाऊस बरसु लागला . हवेतील या अचानक बदलामुळे सगळेच गोंधळले . सगळे जण आडोसा शोधू लागले.
लॉरी वरील माल झाकू लागले . भाजीवाले भाज्या झाकू लागले . संपूर्ण बाजारात आवराआवर सुरू झाली . मीआणि बाबा पळत पळत एका दुकानात थांबलो आणि जोराचा वारा सुरू झाला . आणि पावसाच्या सरी सोबत गारा पडायला लागल्या . मी त्या गारा पडायला लागलो .चेंडू सारख्या छोट्या छोट्या गारा पकडून मी खेळत होती . अचानक आलेल्या पावसामुळे मला खूप मज्जा आली .
पण शेतकरीची शेती पावसावर अवलंबून असते. पूर्ण जगाला शेतकरीच पोसतो. पूर्ण जगाला शेतकरीच पोसतो. सर्वात जास्त नुकसान झालं तर ते शेतकऱ्याचं होईल. अवेळी पाऊस पडला तर पिकांचं नुकसान होईल. आंब्याची मोहर गाळून पडेल.
पावसाळा ऋतु मध्ये पावसाचा आनंद घेतो.पण पाऊस अवेळी पडला तर आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंचे आनंद घेता येणार नाही.
हे निबंध सुधा जरूर वाचवे:-
माझा आवडता ऋतू हिवाळा
माझा आवडता ऋतू पावसाळा
माझा आवडता ऋतू पावसाळा
अचानक आलेला पाऊस निबंध क्रं. 2
त्या दिवशी भयंकर उकडत होतं .सकाळी सहा वाजता सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जसजसा दिवस वर येऊ लागला, तसतसा जीव उकाड्याने हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभी राहिले . तरी केसांतून, हनुवटी खालून ,मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची काहिली झाली . बसून पाहिले . उभे राहून पहिले . टि व्ही बघायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत होते. चैन पडत नव्हती.
तेवढ्यात भर दुपारी अंधारून आले . आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार गार वारा सुटला. जमीनीवरील पालापाचोळा ,कागद कपडे हवेत घुसळू लागले...आणि काही क्षणातच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरु झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळभर पावसाच पाऊस होता. शेजारी, रस्त्यावर ,डोंगरात ,दरीत ,शेतात सर्वत्र पाण्याची लोटच्या लोट सुसाट धावू लागले . एखाद्या अवथळ दांडगट मुला प्रमाणे पाऊस हुंदडत होता. आम्ही मुले सुद्धा त्याच्या अवखळपणा झालो. मनसोक्त नाचु लागलो.
पावसाच्या त्या शितल स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती ? आणि आता पहा . पावसाने काय कायापालट केला होता ! ही किमया फक्त पाऊसच करू शकतो. पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर , मनाच्या आत आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणात आहे ?
तर मित्रांनो हा होता अचानक आलेला पाऊस | Marathi essay on Achanak Alela Paus एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- rainy season essay in marathi
- pavsacha nibandh
- rain essay in marathi
- marathi nibandh on paus