लोकमान्य टिळक मराठी निबंध | lokmanya tilak essay in marathi
नमस्कार मित्रांनो आज आपन देशाचे एक थोर व्यक्ती, महापुरुष लोकमान्य टिळक या विषयावर मराठी निबंध घेऊन आले आहेत.
लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक यांच्या जन्म दोन जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते .बालपणात त्यांना सर्व 'बाळ' म्हणायचे व पुढे याच नावाने ते प्रसिद्ध झाले.
टिळक हे लहानपणापासुनच अतिशय हुशार, तेजस्वी होते .त्यांना कधीही अन्याय सहन होत नसे .त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठमोठ्या सभा व्हायच्या त्या स्वातंत्र्यसंग्रामात टिळक सहभागी झाले.अनेक वेळा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला .
त्यांनी केलेल्या अनेक कार्याबद्दल ते लोकमान्य म्हणून प्रसिद्ध झाले.त्यांनी इंग्रजांच्या अन्याय-अत्याचार ला नेहमी विरोध करायचे .इंग्रजांविरुद्ध जनतेला जागृत करत राहायचे ,सर्व जनतेने एकजुटीने इंग्रजांविरुद्ध लढण्या करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले.स्वातंत्र्याचे विचार क्रांतीची ज्योत जनतेच्या हृदयापर्यंत पोहचावी म्हणुन केसरी व मराठा वृत्त पत्रा ची सुरूवात केली.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच".अशी सिंहगर्जना करून जनतेला त्यांनी प्रोत्साहित केले.1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले.देश सेवा करणारा ,थोर स्वातंत्र्यसेनानी असलेला ,भारताचा तेजस्वी सूर्य मावळला...